माझ्या नावापुढे महाराष्ट्र येते हे खरे आमचे कौतुक - नमिता पाटील

  
डोंबिवली ( शंकर जाधव ) जेव्हा राष्ट्रीय पातळीवर खेळायला जाते तेव्हा आमच्या नावापुढे महाराष्ट्र नाव येते तेच आमचे कौतुक आहे.अथक मेहनत घेऊन राष्ट्रीय पातळीवर खेळतो,त्यावेळी महाराष्ट्राचे नाव येते हीच आमच्यासाठी शाबासकीची थाप आहे असे राज्यस्तरीय नेमबाजीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या नमिता पाटील हिने डोंबिवलीत सरकार सोहळ्यात सांगितले.

         कोपरगावातील नमिता पाटील हिने मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत २५ मीटरस्पोटर्स पिस्तुल या प्रकारात ३०० पैकी २६२ गुण मिळवून वरिष्ठ गटामध्ये पप्रथम क्रमांक पटकाविला.या यशाबद्दल नमितावर कौतुकाहा वर्षाव होत आहे. नमिता हिने रैनक पंडित शुटींग अकॅडमीमध्ये सराव केला असून तिची निवड ओळ इंडिया जी.व्ही.माळवणकर पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.

       स्थायी समितीचे माजी तथा शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या हस्ते कोपरगावातील जनसंपर्क कार्यालयात नमिता पाटील, भक्ती खामकर आणि कवी शिवाजी पाटील यांचा जाहीत सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना पदाधिकारी किशोर मानकामे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी म्हात्रे पुढे म्हणालेकोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी लक्ष साधले पाहिजे आणि  यासाठी येणार्‍या प्रत्येक संकटावर मात केली पाहिजे. अनेक क्षेत्र आहेत त्यामध्ये यश संपादन करता येते.

        संगीत क्षेत्रही चांगले आहे. संगीतक्षेत्र मानसिक आनंद देणारा प्रकार आहे. भारतीय संगीताची पूर्ण माहिती मिळाली की त्यामध्ये भरपूर आनंद मिळतो. शास्त्रीय संगीत ऐकताना माणूस मंत्रमुग्ध होतो. संगीताचा गोडवा सर्वांना समजला तर अनेक गायन निर्माण होतील. यासाठी प्रत्येक शाळेत संगीताचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे रोजगार निर्मिती होईल तसेच अशा शिक्षणासाठी भरपूर प्रतिसाद मिळेल. 

      संगीताचे तसेच वाद्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील परिणामी काही अंशी बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल.तर नमिता पाटील हिने  राष्ट्रीय पातळीवर खेळतो,त्यावेळी महाराष्ट्राचे नाव येते हीच आमच्यासाठी शाबासकीची थाप असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments