शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन


■रिक्षा चालकांचे कल्याण मधील नेतृत्व काळाच्या पडद्या आड


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रिक्षा चालक मालक टॅक्सी युनियनचेअध्यक्ष रिक्षाचालकांचे आधारस्तंभ, शिवसेनेचे पालिकेतील सभागृहनेते, स्थायी समितीचे माजी सभापती, कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक असणारे प्रकाश तथा नाना पेणकर (६८) यांचे आज रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.ऐन गणेशोत्सवापूर्वी त्यांचे निधन झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर दुखाचे सावट पसरले आहे. गेल्या काही महिन्यापासून पेणकर हे यकृताच्या आजारावर उपचार घेत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या एका  मुलाने यकृत प्रत्यारोपण केले होते. कल्याण तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरात रिक्षाचालक-मालक टॅक्सी युनियनच्या शाखेची निर्मिती करून रिक्षाचालकांसाठी पतपेढी देखील निर्माण केली होती.कल्याणातील शिवसेनेचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी शिवसैनिक म्हणून आपल्या कीर्दीची सुरुवात करून मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवकस्थायी समिती सभापतीपरिवहन सभापतीसभागृह नेते आदी महत्वाच्या पदांवरही काम केले. तर कल्याण डोंबिवलीतील विविध पदांसोबत ते रिक्षा संघटनेचे नेते म्हणूनही ते ओळखले जात. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमाना ते उपस्थित राहत नव्हते. त्यांच्या अकस्मात जाण्याने शिवसेना तसेच रिक्षाचालकांचे खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली मोहने टिटवाळा आदी भागात रिक्षाचालकांनी रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला. रात्री ९ वाजता त्यांच्यावर बैलबाजार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येणार असून नाना यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान गेल्या वर्ष दिड वर्षाच्या कालावधीत शिवसेनेच्या विविध ज्येष्ठ नगरसेवक पदाधिकारी यांचे निधन झाले आहे. त्या दुःखातून शिवसैनिक सावरत असतानाच आता प्रकाश पेणकर यांच्या निधनाने त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. कल्याणातील राजकीय पक्षाच्या विविध मान्यवरांनी पेणकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments