भारत बंद हाकेला सर्वपक्षीय संघटना एकत्र - शिवसेना कार्यकर्त्यांची मात्र पाठ
डोंबिवली  ( शंकर जाधव )  केंद्रांच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसन मोर्चाने बंदची हाक दिली होती. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी डोंबिवलीतील  शिवसेनेचे कार्यकर्ते या बंदात  सहभागी झाले नसल्याचे  चित्र शहरात दिसून आले. त्यामुळे शिवसेना बंदात ताकदीने उतरणार नसल्याची कालपासून सुरू असलेली चर्चा आज खरी ठरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली येथे या बंदाचा काहीही परिणाम झालेला  दिसून आला नाही.

 

               यावेळी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७  सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा भारत बंद पुकारण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे डोंबिवलीचे उपाध्यक्ष नंदू धुळे ( मालवणकर ) यांनी पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढले असून सामान्य लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असे सांगणाऱ्या मोदी सरकार आहे कुठे असा सवाल विचारत मोदी सरकारने खुर्ची खाली करावी असे सांगितले.             तर काँग्रेसच्या वर्षा जगताप-गुजर यांनी मोदी सरकारचा निषेध करत महिला सुरक्षेबाबत देखील चिंता व्यक्त केली. तर लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर यांनी देखील  जो शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे. त्याच शेतकऱ्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणी यांनी देखील काँग्रेसच्या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही  आता देखील शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत मोदी सरकारचा निषेध केला.

Post a Comment

0 Comments