कल्याण , कुणाल म्हात्रे : मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवडयात एक नराधमाने महिलेवर अमानुषपणे अत्याचार केल्याने या महिलेचा दुर्दैवाने मृत्यु झाला आहे. ही घटना महिला सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यासाठी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव आणि रामदास नारकर यांनी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलिसांना निवेदन दिले आहे.
महिलांचा वावर असलेल्या शाळा, कॉलेज, बस स्टाप, शापिंग मॉल, अशा ठिकाणी साध्या वेशातील पोलीसांचा कायम बंदोबस्त ठेवावा. महापालिकेच्या माध्यामातून आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्यावेत. अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणी वीट मार्सल, पेटोलीग मोबाईल वाहने यांची गस्त वाढवावी.अशा काही सूचना यावेळी पोलिसांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
0 Comments