मानवसेवेच्या भावनेने १२० निरंकारी भक्तांचे रक्तदान संत निरंकारी मिशनचा उपक्रम

कल्याण , कुणाल म्हात्रे  मानवसेवा हीच ईश्वर पूजा” या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन रविवारी संत निरंकारी सत्संग भवनवालीवलीबदलापुर येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२० निरंकारी भक्तांनी उत्स्फूतपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढीने याठिकाणी रक्तसंकलनाचे कार्य पार पाडले.       उल्लेखनीय आहेकी मागील आठवड्यात संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोन अंतर्गत डोंबिवली आणि उल्हासनगर येथे आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये १७८ निरंकारी भक्तांनी रक्तदान केल्यानंतर याच झोनमध्ये येत असलेल्या मंडळाच्या बदलापूर व अंबरनाथ शाखांनी मिळून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला निरंकारी भक्तगणांनी मानवसेवेच्या भावनेतून उत्तम प्रतिसाद दिला. कोरोनामुळे भेडसावत असलेल्या रक्तटंचाईच्या काळात हे रक्तदान अत्यंत मोलाचे योगदान ठरत आहे.
       बदलापूर येथील रक्तदान शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि संत निरंकारी मिशनच्या मानव कल्याणकारी कार्यांची प्रशंसा केली. त्यामध्ये चार नगरसेवक कॅप्टन आशिष दामलेशरद तेलीभरत पाटीलआकाश साप्तेदोन समाजसेवक तेजस म्हसकर व प्रभाकर पाटील आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा समावेश होता.
       हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे स्थानिक माधवराव पोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापुर आणि अंबरनाथ येथील सेवादल अधिकारीसेवादल सदस्य आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments