रिब्रँडिंग मध्ये डिजिटल माध्यमांचा वाढता सहभाग
■प्रत्येक मोठी संस्था, विशेषत: प्रख्यात ब्रँड्स, त्यांच्या व्यवसायिक प्रवासात कधीतरी रिब्रँडिंग करतात. नवीन पिढीवर लक्ष्य केंद्रित करत व्यवसाय वृध्दी आणि विस्तार करणे अथवा नवीन सेवांची माहिती देणे ही या रिब्रॅडिंगमागील कारणं आहेत. लोगो/नावातील बदलासारखं रिब्रॅडिंग साधं असू शकते किंवा कात टाकत संपूर्ण बदलासह नवीन अवतारात समोर येणं ही असू शकते.        तसं तर रिब्रँडिंग ही एक मोठी कसरतच आहे. सुरळीत आणि यशस्वी संक्रमणासाठी तपशीलाकडे खूप लक्ष देणे आवश्यक असल्याने सर्व माध्यमांचा वापर करणे आणि ठसठशीत संदेश देणे आणि स्पष्ट संवाद साधणे महत्वाचे आहे. आजकाल, आपला संदेश घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात प्रभावी आणि यशस्वी माध्यम म्हणजे डिजिटल मीडिया. हा दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे आणि म्हणूनच कोणत्याही व्यवसायासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.        एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी यांनी सांगितले की न्यूज वेबसाइट्स आणि ब्लॉग्सव्यतिरिक्त डिजिटल मीडियावर संवाद साधण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु, आजच्या घडीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात जलद मार्ग सोशल मीडिया असल्याने रिब्रॅडिंगच्या संदेशवहनाबाबत रणनीती आखताना सोशल मीडियाचे स्थान या यादीत अव्वल आहे. सोशल मीडिया हँडल्सची धोरणं तपासून घ्या. विशेषत: जर आपण पुन्हा नावासंबंधीच्या काम करण्याचा निर्णय घेत असाल.         परंतु, केवळ नाव किंवा लोगो थेट बदलण्याऐवजी, प्रेक्षकांना रिब्रँडिंगच्या आसपासच्या मजकुरासंदर्भात गुंतवून ठेवा. या प्रक्रियेत त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना ते या प्रक्रियेचाच एक भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. भविष्यातील मोठ्या दिवसासाठी त्यांना माहितीने अद्ययावत करत या प्रक्रियेत गुंतवा. परिणामी फक्त चर्चाच घडणार नाही तर ग्राहक ब्रॅण्ड भोवती खिळून राहिल आणि रिब्रँडिंगच्या उद्घाटनाची आतुरतेने पाहतील.         रिब्रँडिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दृश्यमान संवाद होय. निर्धारित प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी संबंधित दृश्यांचा वापर करतोय याची खात्री बाळगा कारण आपल्या प्रेक्षकांनी काय पहावे, यासंबंधी आपल्याला जे वाटते त्याचे ते परिपूर्ण चित्र रेखाटते. हा सर्व जोडण्यासाठीचा प्रयत्न आहे. सोशल मीडियाचा प्रभावी समावेश हा कोणत्याही व्यवसायाने चुकवू नये असा हल्लीचा ट्रेंड आहे. त्यांची पोहोच आणि अनुसरण लक्षात घेता, त्यांनी केलेल्या जाहिरातींचे रिब्रँडिंग, कंपनीची सोशल मीडियातील उपस्थिती चमत्कार करू शकते.              आम्हाला माहित आहे की सोशल मीडियाने ब्रँड आणि प्रेक्षकांमधील अंतर कमी केले आहे. थेट संवाद एक सखोल आणि मजबूत संबंध तयार करतो. अशा प्रकारे, रिब्रँडिंग प्रक्रियेदरम्यान ग्राहकांचा अभिप्राय सकारात्मकपणे घेणे आणि त्यावर काम केल्याने कंपनीला भरभराट होण्यास मदत होऊ शकते. हे प्रेक्षकांमध्ये सकारात्मक प्रतिष्ठा निर्माण करते, आपल्यावर अधिक विश्वास ठेवते आणि आपल्याला अधिक गांभीर्याने घेते.              आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख निर्माण झाल्यावर आणि व्हिज्युअल ब्रँडिंगची रणनीती आखल्यानंतर, रिब्रँडिंगच्या मजकुरात कंपनी संस्कृती आणि मूल्यांचा समावेश करून ते अधिक अस्सल करते. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनाही यात सहभागी करून घेऊ शकता.               सोशल मीडियाचे व्यवसायांना बरेच फायदे आहेत यात शंका नाही. आपल्या प्रेक्षकांविषयीच्या योग्य आकलनासह निश्चित धोरण आखणे आणि योग्य व्यासपीठांचा वापर करणे याचे हे मिश्रण आहे. एकदा का तुमचा मजकूर झपाट्याने प्रसारीत/ व्हायरल झाला की, लोक ब्रँडवर नजर टाकतील, त्याबद्दल अधिक शोधण्याचा प्रयत्न करतील आणि हळूहळू त्याचा एक भाग होतील. म्हणून सोशल मीडियावरील उपक्रमांचे रिब्रँडिंग केल्याने आपल्याला केवळ विद्यमान क्लायंट बेससह विश्वास निर्माण करण्यास मदत होणार नाही तर आपल्याला नवीन ग्राहक मिळविण्यात देखील मदत होईल.

Post a Comment

0 Comments