डोंबिवली , शंकर जाधव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सहसचिव विद्यार्थी सेना प्रितेश पाटील यांच्या संकल्पनेतून आजदे विभाग विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष विनय कुंभार आणि सहकारी यांच्या मार्फत ऑनलाइन शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड रहावी म्हणून लहान मुलांना गोष्टीचे पुस्तक वाटप करण्यात आले..
यावेळी विद्यार्थी सेना विभाग सचिव शिवानी मोरे, शाखा अध्यक्ष दिप सोनावणे, उपशाखा अध्यक्ष आदित्य पाटील, ज्येष्ठ नागरिक राजपूत काका, गायकर मामा व महिला सहकारी उपस्थित होते.
0 Comments