मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते सिंहगड शाखेचे उद्घाटन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता कल्याण पूर्वेत मनसे देखील सक्रीय झाली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी विभागात अवधूत राणे यांच्या मनसे सिंहगड शाखेचे उद्घाटन मनसे आमदार राजु पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राजू पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा सल्ला दिला. तसेच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवीत पक्ष संघटना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी शाखा अध्यक्ष हरीश शेलारमनविसे उपशहर सचिव अतीन रोकडेजिल्हा सचिव संदीप नावगे, मनसे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईविधानसभा अध्यक्ष अनंता गायकवाडमहिला जिल्हा अध्यक्ष स्वाती कदम, शहर सहसचिव यतीन जावळेमनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडेउपशहर अध्यक्ष संजय राठोडयोगेश गव्हाणेमनविसे उपशहर अध्यक्ष सतीश उगले तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.


Post a Comment

0 Comments