धावत्या एक्सप्रेस मधून प्लॅटफॉर्म वर कोसळलेल्या वृध्द महिलेचा जीव आरपीएफ जवानाने वाचविला

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण रेल्वे स्थानकात चुकून कामियानी एक्सप्रेस मध्ये बसलेल्या वृध्द महिलेला आपण दुसऱ्याच एक्सप्रेस मध्ये नसल्याचे कळताच तिने धावत्या एक्सप्रेस मधून प्लॅटफॉर्म वर उतरण्याचा प्रयत्न केला असता ती प्लॅटफॉर्म वर पडल्याने  एक्सप्रेस खाली जात असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ रेल्वे सुरक्षेसाठी तैनात आरपीएफ जवानाने आपला जीव धोक्यात घालून वृध्द महिलेचा जीव वाचविल्याची घटना   सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.      सिबिडी बेलापूरला राहणाऱ्या  तुनुगुंटला अरुणा रेखा ही ६२ वर्षाची महिला कल्याण रेल्वे स्थानकात कोणार्क एक्स्प्रेस गावी जाण्यासाठी आली होती. मात्र कोणार्क एक्सप्रेस एवजी  फलाट क्रमांक चार वर पावणे तीन वाचता आलेल्या कामीयानी एक्सप्रेस मध्ये चुकीने  तुनुगुंटला अरुणा रेखा बसली असता तिच्या लक्षात आल्यावर घाईगडबडीत  तिने लागलीच उतरण्याचा प्रयत्न केला. 
         तो पर्यत एक्सप्रेस सुरू झाल्याने तिने धावत्या गाडीतून प्लॅटफॉर्म वर उर्ण्याव्याचा प्रयत्न करतना ती प्लेटफॉर्मवर कोसळली  व प्लॅटफॉर्म आणि एक्सप्रेसच्या मध्ये जाताना आर पी एफ जवान मंगेश थेरे याने जीवाची पर्वा नकरता वृध्द  महिलेला  वाचवले ही सगळी घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली आहे. प्रसंगावध राखून मंगेश थेरे यांनी वृध्द महिलेचा जीव वाचविला बद्दल त्याचे कौतुक जात आहे.

Post a Comment

0 Comments