वामनदादा कर्डक जन्म शताब्दी निमित्त 'गीत गायन स्पर्धा'

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्त 'गीत गायन स्पर्धेचे आयोजन पु ल कट्ट्याच्या वतीने करण्यात आले आहे.           पु ल कट्टा, कल्याण गेली दोन दशके कल्याण शहराच्या सांस्कृतिक- साहित्यिक- सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. 'पु ल जन्मशताब्दी' साजरी केल्यानंतर 'वामनदादा कर्डक जन्मशताब्दी' वर्षभर साजरी करण्याचा या मंचचा मानस आहे. या करिता जन्मशताब्दी महोत्सव समितीचे स्वागताध्यक्षपद आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्वीकारले आहे. कवी- कथाकार- पटकथाकार किरण येले यांचे अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, कार्याध्यक्ष पदी लोककवी प्रा. प्रशांत मोरे आहेत.
           जन्मशताब्दी वर्षाची दिमाखदार सुरुवात १४ ऑगस्ट रोजी कल्याण सार्वजनिक वाचनालयच्या सहकार्याने करण्यात आली.  महोत्सव समितीने "वामनदादा कर्डक गीत गायन स्पर्धा" जाहीर केली आहे. गीत गायन स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून, प्राथमिक फेरी ऑनलाईन तर अंतिम फेरी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून प्रवेश निःशुल्क आहे.

 


             स्पर्धेत केवळ वामनदादा कर्डक लिखित गीत गायनच ग्राह्य धरले जाईल.  स्पर्धकांनी गीत गायनाचा ऑडिओ,  व्हिडियो बनवून wamandadageet@yahoo.com ह्या ईमेल आयडीवर पाठविणे. ऑडिओ, व्हिडियो ३ मिनिटहून अधिक लांबीचा नसावा आणि १८ एमबीपेक्षा मोठा नसावा.  स्पर्धकाने गीत गायन पूर्वी केवळ आपले नाव आणि संपर्क क्रमांक सांगावा. अवांतर निवेदन करू नये.  
               नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कल्याण येथे होणाऱ्या जलसा कार्यक्रमात अंतिम फेरीसाठी पात्र गायक स्पर्धकांना सामावून घेत, अंतिम फेरी घेण्यात येईल.  
विजेत्यांना  प्रथम पुरस्कार रोख रक्कम ५ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार रोख ३ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय पुरस्कार रोख १,५०० व सन्मानचिन्ह तसेच ३ उत्तेजनार्थ पुरस्कार- प्रत्येकी रोख  एक हजार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.                नोंदणी व ऑडिओ, व्हिडीओ सादर करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२१ असेल. प्राथमिक फेरीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी "वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती फेसबुक पेज"वर जाहीर करण्यात येईल. 
            अधिक माहितीसाठी महेंद्र भावसार (मो.- ७०२१९६७५८७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments