Header AD

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

 

 


ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. 



         या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील रिव्हरवूड पार्क मेन गेट व रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये अनधिकृत शेड तोडून ०३ टपऱ्या, ०३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकुम कशेळी रोडवरील हातगाड्यावर कारवाई करून १७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.


   

         नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हॉटेल,गावदेवी तीन हात नाका, राममारुती रोड तलावपाळी, स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी  नाका कोर्ट नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील वर्तकनगर नाका, रामचंद्र नगर, काजुवाडी या परिसरातील हातगाडी, फेरीवाले हटविण्यात आले.


    

         उथळसर प्रभाग समितीमधील फ्लॉव्हर व्हॅली, सर्व्हिस रोड, नारळीपाडा, पाचपाखाडी येथील पदपथांवरील ०३ टपरी हटवून सामान जप्त करण्यात आले.  वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून १३ हातगाडया, ४ लाकडी बाकडे, २ टपरी, ०१, वजन काटा ०१, शेगडी ०१ सामान जप्त करण्यात आले.


   

          सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर,अलका खैरे, महेश आहेर आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on September 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads