केडीएमसी मुख्यालयात पालिका अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कल्याण  ( शंकर जाधव ) ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर  एका गुंडाने धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची बोटे छाटली होती.या हल्ल्याची दाखल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तर मनसेने या गुडाला चोप देणार असल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध करत काळ्या फिती लावून एक दिवस काम बंद आंदोलन केले.

  


          पालिकेच्या मुख्यालयात अधिकारी वर्ग एकत्र येऊन त्यांनी या संदर्भातील निवेदन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले.ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी अधिकाऱ्यांनी केली.फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपळे यांच्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.        यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार म्हणाले, सहाय्यक पोलिस आयुक्त  पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध केला आहे. त्यांच्यावर हल्ल्या करणाऱ्या माथेफिरुवर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीची हिम्मत होणार नाही.

Post a Comment

0 Comments