यंदाच्या गणेशोत्सव सर्वांना आरोग्यदायी, सुखकर जावो महापौर व आयुक्तांनी दिल्या ठाणेकरांना शुभेच्छा
ठाणे , प्रतिनिधी  : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने  भक्तिमय वातावरणात साजरा करत ठाणेकरांना हा सण आरोग्यदायी, सुखकर जावो अशा भावनिक शुभेच्छा महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.

   


       गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. या संपूर्ण वातावरणात उद्या विघ्नहर्ता गणरायाचं प्रत्येकाच्या घरी आगमन होत आहे. हे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

     


     कोरोनामुळे ठाणेकरांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आवश्यक ती सर्व काळजी घेत भक्तिमय वातावरणात साजरा करावा. हा गणेशोत्सव सर्वांना आरोग्यदायी, सुखकर जावो अशा भावनिक शुभेच्छा महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments