राष्ट्रवादीच्या प्रयत्नाने राहुल नगर परिसर कचरामुक्त

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रयत्नाने कल्याण पूर्वेतील राहुल नगर परिसर कचरामुक्त झाला असून नागरिकांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. १०५ चिंचपाडा येथील राहुल नगर येथे देखील असेच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. 

तसेच परिसरात रोगराईचे प्रमाण देखील वाढले होते. याबाबत  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भावेश सोनावणे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पत्राची दखल घेऊन केडीएमसीचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांची होणारी गैरसोय आणि संभाव्य रोगराई याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त रामदास कोकरे यांनी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाईचे आदेश दिले.
 कोकरे यांच्या आदेशांनंतर राहुल नगर परिसरातील कचरा त्वरित उचलण्यात आला आहे. कचरा उचलल्याने येथील परिसर कमालीचा स्वच्छ दिसत असून नागरिकांची रोगराई आणि दुर्गंधी पासून मुक्तता झाली आहे. आपल्या पत्राची आणि पाठपुराव्याची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने परिसर कचरामुक्त केल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भावेश सोनावणे यांनी उपायुक्त रामदास कोकरे आणि प्रभाग अधिकारी कांबळे यांचे आभार मानले आहेत. 

 यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विलास म्हात्रे उपस्थित होते. असेच कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका लवकरच कचरा मुक्त झाल्यशिवाय राहणार नाही असे मत यावेळी भावेश सोनावणे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments