विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

  
डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसांनी गुन्हा दखल झाल्यानंतर आतापर्यंत २९  जणांना अटक केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील  सतर्क राहणे गरजेचे आहे .          या आरोपीना कठोर शिक्षा होईल असे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .ते पुढे म्हणाले, मानपाडा पोलिस स्थानकावर प्रचंड ताण आहे ,या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे बारा लाख लोकसंख्या आहे.          तर  १४० पोलिस कर्मचारी सेवेत आहेत ,त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण पडतोय ,काटई आणि दावडी या ठिकाणी नवीन दोन पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी आहे, याबाबत गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे .त्याचप्रमाणे दिवा भागासाठी नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे साठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments