रिक्षा भाड्याने देतांना पोलीस स्टेशनला माहिती देणे बंधन कारक


■गुन्हेगारी टाळण्यासाठी रिक्षा संघटना आणि पोलिसांची संयुक्त बैठक...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रिक्षा चालवायला भाडे तत्वावर  ड्रायव्हरला देतांना ड्रायव्हरची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक असल्याची सूचना महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे व.पो.नि. कल्याणजी घेटे यांनी रिक्षा चालकांना केल्या आहेत. तर शासनाने खुल्या पद्धतीने रिक्षा परमीटचे वाटप केल्याने रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींची घुसखोरी झाली असल्याचे मत जुन्या रिक्षाचालकांनी व्यक्त केले आहे.   शहरात कायदा सुव्यवस्था, महिला, बालकांची  सुरक्षितता याकरिता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रिक्षाचां वापर गुन्ह्यात होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महात्मा फुले पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणजी घेटे व पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या  उपस्थितीत रिक्षा संघटनांचे पदाधिकारी  यांची संयुक्तिक बैठक पार पडली. रिक्षाचां गुन्हेगारी कुत्य वापर टाळणे व  रिक्षा व्यवसाय धंद्यात अपप्रवृत्ती रिक्षा चालक अटकाव प्रतिबंध याकरिता रिक्षा परवाना धारक रिक्षा चालकांना काही  सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय करताना खाकी किंवा पांढरा गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. परवानाधारक रिक्षा मालकाने आपली रिक्षा  ड्रायव्हरला भाडेतत्वावर चालवायला दिली असल्यास या ड्रायव्हरची   माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक आहे.  परवानाधारक रिक्षा मालकाने आपली रिक्षा विना लायसेन्स बॅच अनाधिकृत ड्रायव्हर, अल्पवयीन मुले व्यसनाधिन ड्रायव्हर यांना भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेली असल्याचे पोलिस, आरटीओ तपासणीत निर्देशास आल्यास या रिक्षाचा परवाना निलंबित किंवा रद्द करून रिक्षा मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आधिकुत रिक्षा चालकांनी अनाधिकृत अपप्रवृत्ती रिक्षा चालकांची तसेच संशयास्पद व्यक्तीघटना याबद्दल माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे माहिती देणारे रिक्षा चालकांचे नाव गुप्त राखले जाईल. रात्री अपरात्री एकट्या महिला प्रवासी यांना सुरक्षित त्यांच्या घरी सोडण्यास मदत करावी. सार्वजनिक ठिकाणी रोडरोमिओ  अपप्रवृत्ती व्यक्ती महिलेची टिगंल टवाळी अथवा छेड काढली किंवा संशयास्पद वर्तन करत असेल तर नागरिकांच्या मदतीने संघटीतपणे विरोध करुन त्वरित सबंधित पोलिस स्टेशनला या घटनेची खबर द्यावी. 
या सुचनांचे रिक्षा चालकांनी पालन करावे असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. या बैठकीला महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन चे प्रमुख पदाधिकारी व रिक्षा स्टॅंड पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. दरम्यान शासनाने खुल्या पद्धतीने रिक्षा परमीटचे वाटप केल्याने रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींची घुसखोरी झाली आहे. अनेकांनी रिक्षांचे परमिट घेऊन रिक्षा भाड्याने दिल्या आहेत. या रिक्षा अनेक गुंड आणि व्यसनांध  प्रवृत्तीचे तरूण चालवत असून यामुळे अनेक गुन्हे घडत असल्याचे जुन्या रिक्षा चालकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments