गणेशोत्सव मंडाळाचे मंडपाचे भाडे माफ करण्याची आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडपाचे भाडे माफ करावे अशी मागणी कल्याण पश्चिम विधानसभा आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.           


कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात १५० ते २०० सार्वजनिक गणेशोत्सव साजरी करणारी मंडळे आहेत.  कोवीड - १९ च्या प्रादुर्भावामुळे  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना देखील आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळाना दिलासा मिळावा सर्वच क्षेत्रात ओढावलेले आर्थिक संकट पाहता सार्वजनिक मंडळे  लोकसहभागातूनलोकवर्गणीतून  गणेशोत्सव साजरा करीत असतात. परंतु कोणत्याही नागरिकांकडुन वर्गणी घेवू नये व शासनाचे निर्देश असल्यामुळे सार्वजनिक मंडाळापुढे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आर्थिक संकटाला जावे लागत आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा खंडित होवू नये व शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी कल्याण डोंबिवली मनपाने जसे ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडापाचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे केडीएमसीने देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडपाचे भाडे माफ करून दिलासा द्यावा. अशा अशायाचे निवेदन केडीएमसी आयुक्तांना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहे.


Post a Comment

0 Comments