बलात्कार प्रकरणी मनसेची कल्याण मध्ये निदर्शने

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण व डोंबिवली येथे अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे बलात्कार केला गेला त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मनसे पदाधिकारीपुरुष पदाधिकारीमनसे नगरसेविका, महिला सेनाविद्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटना मनसैनिक यांनी सहभाग या आंदोलनात काळे कपडे घालत या घटनेचा निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे लहान मुलींनी घरातुन निघायला भिती वाटते अश्या शब्दात घोषणा देउन आपला राग व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कल्याण नगरीत सुभेदाराच्या सुनेला पुर्ण मानसन्मानाने साडी चोळी देउन घरी पाठवले त्याच कल्याण डोंबिवलीत बलात्काराचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी घराबाहेर पडुन महीलांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्या नराधमांची हिम्मत वाढली आहे. त्यामुळे दिशा कायद्याची अंमलबजावणी करुन त्वरीत ह्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी ही मागणी करण्यात आली. 


Post a Comment

0 Comments