तांबे, पितळाची भांडी चमकवणाऱ्यांचा कलई व्यवसायाला उत्सवांमुळे 'अच्छे दिन'

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोरोना पार्श्वभूमीवर अनेक लघुउद्योगांना फटका बसला असुन व्यवसायातील मंदीला सामोरे जावे लागले असताना कोरोना नियमातील शिथिलेतेमुळे गणेशोत्सव, आगामी नवरात्र उत्सवामुळे अडगळीत पडलेल्या तांब्या, पितळाच्या भांड्यांना कलई करून लकाकी देण्याच्या कलई व्यवसायामुळे कलईवाल्यांना रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यांना "अच्छे दिन" आल्याचे दिसत आहे. घरोघरी वापरण्यात येणाऱ्या तांबे-पितळाच्या भांड्यांची जागा स्टेनलेस स्टीलने घेतली आणि पारंपारिक तांब्या, पितळेची भांडी स्वयंपाक घरातुन अडगळीत गेल्याने तांबे पितळाच्या भांड्यांना कल्हईला फारसा उत्साह नसल्याने बदलत्या काळात कल्हई करणारे कारागीरही दिसनेसा झाल्याने कलई  व्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र दिसत होते. गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र उत्सवामुळे कलई कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे. कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रात वाढते शहरीकरण होत असताना अद्याप देखील स्थानिक कोळीवाडेमनपाक्षेत्रातील ग्रामीण गावे आपला ग्रामीणटच जतन करीत असल्याचे दिसुन येते. पितळी भांड्यांना आतून कल्हई लावण्यासाठी कल्हईवाले गल्लोगल्ली फिरून आपला कल्हई व्यवसाय करायचे. अंगणात कल्हई लावणारा बसायचा. तो कोळशाच्या निखाऱ्यावर भांडे गरम करून नवसागराची पूड टाकून स्वच्छ करून लगेचच कथिलची कांडी फिरवायचा. या कांडीच्या  करामतीमुळे तांबेपितळाचे भांडे आतून चांदीसारखे चंदेरी बनयाचे त्यामुळे कल्हईवाल्याला खूप महत्त्व होते. काही वर्षांपूर्वी बंगल्यात राहणाऱ्या धनवान पासुन  झोपडीतील गरीबा पर्यंत सगळ्यांकडेच तांबेपितळाची भांडी असायचीच.कल्हई करणारा आपल्या कौशल्याने भात्याने लाकडी कोळसा फुलवत तांबे पितळ्याची भांडी गरम करीत कलिथाचा डाग देत नवसागरची पावडर वापरीत तांब्या पितळची भांडी लोकांना रुपेरी करीत चमकवुन अगदी नाममात्र पैशात देत असे. पण आता ही भांडी महाग असूनत्यांना घासण्यासाठी लागणारी मेहनत यामुळे सर्व भांडी अडगळीत पडली आहेततर काहींनी मोड म्हणून विक्री केली. परिणामी कल्हई कारागिरांना इतर व्यवसायाकडे वळावे लागले. असे असताना देखील कल्याणच्या टिळक चौकात दर दोन आठवड्याला एक दिवस कर्जत येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिला ऊषा जाधव त्यांच्या सहकारी सुरेखा म्हस्के येत लोकसंपर्क व आपल्या कल्हई कामांच्या हातखंड्याच्या जोरावर आपला पिढीजात कल्हई चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सावरत आहेत.महागाईचा फटका कल्हई व्यवसायालाही बसला आहे. त्यामुळे कल्हईच्या दरात वाढ झाली आहे. पुर्वी सारखे कल्हई काम मिळत नसुन  कल्हई करण्यासाठी लागणारे कथिल धातूचे दर ११०० रुपये प्रतिशंभर ग्रॅम आहेत. ५० रुपयांना नवसागरचा एकबार मिळतो. कल्हईसाठी लागणारे कोळशाचे दर वाढले असून९० आणि १०० रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे कल्हईच्या दरात वाढ झाली आहे. कल्हई करण्यासाठी आता प्रत्येक भांड्यांसाठी आकाराप्रमाणे १०० ते ७०० रुपयांपर्यंत घेण्यात येतात. ५०० रुपये डझनावर छोटी भांड्यांना कल्हई करण्यात येते. तांबेपितळाच्या भांड्यांचा वापर केवळ गौरी-गणपती,नवरात्र उत्सव  देवपूजा आणि कन्यादान करण्यापुरताच नागरिक करतात. गणपती उत्सवामुळे कल्हई काम बर्यापैकी मिळत असल्याचे कल्हई कारागीर ऊषा जाधव यांनी सागंतकल्हई केलेल्या  तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते.  पितळाच्या भांड्यात शिजवलेले अन्न अधिक रुचकर बनते. तांबेपितळाच्या भांड्यातील अन्न नासू नये,  म्हणून कल्हई करतात अशी माहिती दिली. तसेच तांब्या पितळाची भांडी घराघरांतून हद्दपारहोत असताना मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तांब्या पितळाच्या भांड्याचा वापर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments