अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान


■कल्याण परिमंडलातील अभियंत्यांनी जोपासला सामाजिक वसा...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ५२ अभियंत्यांनी रक्तदान करत सामाजिक वसा जोपासला.मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कल्याण एक मंडलचे अधीक्षक अभियंता दीपक पाटीलकल्याण दोन मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळेस्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता विजय मोरेकार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजनसबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडेसहसचिव रवींद्र नाहीदे यांच्यासह पदाधिकारी व अभियंते उपस्थित होते.
राज्यातील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन संघटनेने अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा विधायक उपक्रम राबवला. या विधायक उपक्रमाला ऊत्स्फुर्त प्रतिसाद देत संघटनेचे बोबडेनाहिदे हे प्रमुख पदाधिकारीउपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह ५२ जणांनी या शिबिरात रक्तदान केले. या शिबिरासाठी डोंबिवली येथील प्लाझ्मा रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments