ठाण्यात फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई सुरूच

 

■शहरातील फेरीवाल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे....


ठाणे ,  प्रतिनिधी  : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.


           या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हॉटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारुती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामान जप्त करण्यात आले.  तसेच स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व कोर्ट नाका येथील २० फळांच्या पाट्या जप्त करण्यात आल्या.            तर दौलत नगर ते भाजी मार्केट, सिद्धार्थ नगर, स्टेशन रोड व मंगला स्कूल या परिसरातील फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.  तसेच प्रेम नगर येथील २ प्लास्टिक शेड काढून १ वजन काटा जप्त करण्यात आला. कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन रोड ते कळवा भाजी मार्केट व खारेगाव मार्केट परिसरातील पथ विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.           उथळसर प्रभाग समितीमधील पाचपाखाडी ठामपा मुख्यालय समोर व खोपट रोड अभिषेक हॉटेल जवळील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर कारवाई करून अनाधिकृत पोस्टर्स काढण्यात आले.  तसेच मुंब्रा प्रभाग समितीमधील टीएमसी हॉस्पिटल कंपाऊंड वॉल लगत उभारलेली झोपडी तोडण्यात आली. कळवा प्रभाग समिती विटावा गाव परिसरातील मुख्य रस्ता व पदपथावरील बॅनर्स काढण्यात आले.            यासोबतच दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड व मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये ०४ हातगाड्या, ०२ लोखंडी स्टॉल्स जप्त करण्यात आले.  तर ०३ अनधिकृत शेड तोडून ५० अनधिकृत बॅनर्स काढण्यात आले.       सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, सागर साळुंखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

Post a Comment

0 Comments