सतत पडणाऱ्या पावसा मुळे टिटवाळ्यातील चाळींना नदीचे स्वरूप

 कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळ्यातील इंदिरा नगर परिसरात मगंळवारी दुपारी अवघ्या तासाभराच्या पावासाने चाळीमधील ३० ते ३५ रुम मधील घरामध्ये पावासाचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबीयांचे सामानाचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे या चाळींना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 


                          

       टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात जी. आर. पाटील शाळेच्या मागील परिसरात इंदिरा नगरघोटसईनादंप टेकडी परिसरातील पावासाचे पाणी वाहुन येते. मगंळवारी दुपारच्या सुमारास पडलेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने पाणीच पाणी झाले. चाळीच्या ३०ते ३५ घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाल्याने कोरोना पार्श्वभूमीवर अर्थिक मेटाकुटीला आलेल्या चाळकरी कुटुंबीयांना आर्थिक झळीला समारे जावे लागले आहे. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह भरणी करून बदलुन अनाधिकृत चाळी बांधल्या जातात. नैसर्गिक समतोल बिघडवला जातो. पाण्याचा निचारा होण्यास जागा न मिळल्याने दोन चाळी मधील मोकळ्या जागेतुन पावासाचे निचारा न होणारे पाणी मार्ग काढते व त्यांचा फटका सर्व सामान्य चाळकर्याना बसतो. असे जाणकारांचे मत असुन कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाने नाल्यासाठी डी.पी तयार करून नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलणार्या वर कारवाईचा बडगा उचला पाहिजे अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.

Post a Comment

0 Comments