उजव्या बाजूला हृद्य असलेल्या १८ महिन्यांच्या बालकाला डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला मदतीचा हात


 
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  उजव्या बाजूला हृदय असणे हि दुर्मिळ बाब असलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या मुलाला जीवदान दिले. ऑपरेशन यशस्वी झाल्यांनातर या चिमुरड्यासह पालकांनी शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले यावेळी खासदारांनी या मुलाची विचारपूस करत त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहत असलेल्या युग महाजन या १८ महिन्याच्या बालकाचे हृदय उजव्या बाजूला असल्याने त्याला त्रास होत असल्याने युगचे वडील प्रवीण महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मुलाच्या उपचारासाठी धावपळ केली. मात्र मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये उपचार केल्यावाचून पर्याय नाही असे तेथील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
 छोटासा छायाचित्रकाराचा व्यवसाय करणाऱ्या आपल्याला मुंबईतील रुग्णालयांचा खर्च आणि उपचार परवडतील का अशा विवंचनेत असलेल्या प्रवीण महाजन यांची भेट कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी झाली. डॉ. शिंदे यांनी या चिमुरड्याची  संपूर्ण आरोग्यविषयक माहिती  घेऊन त्याच्या शस्त्रक्रियेसाठी हालचाल सुरू केली.
बाई जेरबाई वाडिया बालकांच्या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. निरंजन गायकवाड यांच्याशी चर्चा करत कंजेनिटल डायफ्रॅगमॅटिक हर्निया या  शस्त्रक्रियेसाठी साधारणता साडे तीन ते चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. डॉ.शिंदे यांनी हा उपचाराचा खर्च  शून्यावर आणून प्रवीण महाजन यांच्या बालकाचे उपचार केले.

 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर चिमुरड्याने आपल्या आई-वडिलांसोबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.  यावेळी महाजन कुटुंबीयांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments