भिवंडी शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या वऱ्हाळ तलावा वर हिरवा तवंग ,दुर्गंधी...

भिवंडी दि 30  (प्रतिनिधी )  शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे  दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी  आयुक्त सुधीर देशमुख यांनी  संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .
           भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे,  
         शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments