राष्ट्रवादीकडून डोंबिवली घटनेचा निषेध

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : डोंबिवली येथे १५ वर्षीय मुलीसोबत घडलेल्या दुर्दैवी आणि लज्जास्पद घटनेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस स्टेशन येथे निषेध व्यक्त करण्यात आला.            तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी वरिष्ट पोलिस निरिक्षक यांना केली. यावेळी जिल्हा निरिक्षक माया कटारियाजिल्हा सचिव सुरैया पटेल युवक कल्याण प विधानसभा योगेश माळीयुवक जिल्हा उपाध्यक्ष भावेश सोनवणे आणि इतर महिला व युवक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments