निवडणूक आयोगा कडून दिलेल्या सूचनांचे पालन काटे कोरपणे झाले पाहिजे


   ठाणे ,  प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन झाले पाहिजेत अशी मागणी शहर काॅग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेत करण्यात आली.             ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,प्रदेश सदस्य राम भोसले,सुखदेव घोलप,राजेश जाधव,जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,महेंद्र म्हात्रे,प्रदेश काँग्रेस सचिव आफताब शेख,काॅग्रेस प्रवक्ते रमेश इंदिसे,गिरीश कोळी,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे,रविंद्र कोळी,रेखा मिरजकर,अक्रम बन्नेखान आदि पदाधिकारी उपस्थित होते.            या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,या निवडणूका पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्यात परंतु ठाणे महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचना यासाठी जी समिती नेमली आहे तीच अयोग्य असल्याचा आरोप करत असताना त्यानी 2017 मधील निवडणूकीत ज्या पद्धतीने समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये जिल्हाधिकारी व तत्सम अधिकारी याचा समावेश होता.          हे निदर्शनास आणून देत या समितीत विविध ठीकाणी वादग्रस्त असलेले अशोक बुरपूल्ले यांच्या समावेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले तसेच स्वरूप कुलकर्णी सारख्या संबधच कुठे येतो असा सवाल केला,2017 च्या निवडणुकीतील काही पॅनल मधील तफावत कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करून  लक्षात आणून दिले  तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून यामध्ये हस्तक्षेप झाला असल्याचे निदर्शनास आणले त्यावेळेस राखीव मतदारसंघातही सुसूत्रता राखली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


            निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकातही अशा प्रकारचे फेरफार होत असल्याचे लक्षात आले असल्याचे दिसत आहे,म्हणूनच त्यांनी काही मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणूनच आगामी निवडणुकील प्रभाग रचना पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगा कडून दिलेल्या प्रत्येक सूचनाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले या सर्व गोष्टींवर आमचे शिष्टमंडळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही विक्रांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments