मृत्युनंतरही महिलेने अवयव दान केल्याने चार रुग्णांना मिळाले जीवनदान


■मुंबईतील हॉस्पिटल्‍समध्‍ये अवयव पोहोचविण्यासाठी केला  ग्रीन कॉरिडर...


कल्याण, कुणाल  म्हात्रे   : रुग्णालयात आजारावर उपचार घेत असलेल्या मोहने येथील ३४ वर्षीय महिलेच्या मेंदूच्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी तिचे अवयव दान करण्यास संमती दिली आणि चार रुग्णांवर प्रत्यारोपण करीत रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.कल्याण जवळील मोहने येथे राहत असणाऱ्या 34 वर्षीय महिलेवर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु असताना तिला ब्रेनडेड झाला असल्याची माहिती उपचार करीत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजली असता त्यांनी या महिलेच्या आजाराबाबत तिचे पती व दोन मुलांना माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने सर्जिकल आणि नॉन सर्जिकल टीमनर्सिंग टीम,मेडिकल सोशल वर्कर्स आणि पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेच्या पतीने अवयवदानास संमती दिल्यानंतर प्रत्यारोपणाचा मार्ग सुकर झाला. या रुग्ण महिलेला कॉर्टीकोव्हेनस  साइनस थ्रोम्बोसिस हा आजार झाल्याने तिचा ब्रेनडेड वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केला होता. १६ सप्टेंबर रोजी महिला मरण पावल्याने ग्रीन कापणी केलेले अवयव हृदययकृत आणि मूत्रपिंड मुंबईत नेण्याकरिता ग्रीन कॉरिडोर तयार केले होते.कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयाने २८ वे यशस्वीरित्या प्रत्यारोपण सक्षम केले. ब्रेनडेड घोषित झाल्याने रुग्णांच्या कुटुंबांचे वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी समुपदेशन महत्त्वाचे ठरले गेले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरशी त्वरित साधण्यात येऊन पूर्णप्राप्त अवयव म्हणजेच हृदययकृत आणि मूत्रपिंड मुंबईतील रुग्णालयात ग्रीन कॉरिडोर तयार केला गेला. कल्याणचा फोर्टिस रुग्णालयांमध्ये दात्यांची देखभाल आणि अवयव पुनर्प्राप्ती ची यशस्वी सुरुवात करण्यात आली.शवविच्छेदन अवयवदानाबद्दल रूग्णालयाच्या संचालक डॉक्टर सुप्रिया अमेय म्हणाल्या आजच्या आयुष्यात रुग्णांसाठी व कुटुंबियांनकरिता अवयव दान जितकी आशा पेरीत करते तितकीच ती दात्यांच्या कुटुंबीयांच्या धैर्याबद्दलही महत्त्वाची ठरत असून दुखाच्या वेळेस अवयव दान करण्याचा निर्णय हा धाडसी आहे. कुटुंब शोकाकुल असतांना समाजाला आपण देणे लागत असल्याची भावना या निमित्याने जागृत झाली असल्याचे डॉक्टर सुप्रिया यांनी सांगितले. या अवयवदानामुळे मुंबईचे २८ वे शवदान आणि प्रत्यारोपण यशस्वी झाले.

Post a Comment

0 Comments