डीपी रस्त्यामधील इमारतीवर केडीएमसीची कारवाई आय प्रभागात दावडी गावातील इमारत


■कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३०० हून अधिक इमारतील डीपी रस्त्यात...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. या इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या सहा मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.          पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई केली. या कारवाई दरम्यान इ प्रभाग अधिकारी भारत पवारअधीक्षक किशोर खुताडे हे देखील उपस्थित होते. या बांधकामाबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी तक्रार केली होती.

       


         कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये सुमारे ३०० हून अधिक अशा इमारती आहेत.  अशाच प्रकारे दावडी येथील विकासक मुन्ना सिंग यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक सहा मजल्याच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती.        तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

       


          या इमारतीच्या बांधकामाबद्दल तक्रार आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. आज आय आणि इ प्रभागाचे अधिकारीकर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारीएक जॉब प्रेशर मशीन च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. 

     


          दरम्यान डीपी रोडमधील इमारती निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली असून आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई देखील सुरु आहे. यापुढे डीपी रोडवरील बांधकामांवर केवळ तोडक कारवाई न करता हि बांधकामे पूर्णतः निष्कासित केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी दिली.

Post a Comment

0 Comments