सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत - राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांचे आवाहन
ठाणे,दि.२९ (जिमाका) : जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत त्यांच्या कल्याणासाठी महापालिकांनी आणि संबंधित प्रशासनाने प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी आज येथे केले.           येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील सभागृहात डॉ. वावा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महापालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महापालिकांचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदी उपस्थित होते.            सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचे काम ते करतात. त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी. वावा यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. सफाई कामगारांसाठी निवारा, पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या, विविध सुरक्षा साहित्य आदीबाबत आढावा घेण्यात आला.        सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी यावेळी दिल्या. 

Post a Comment

0 Comments