संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्ती शिथिल करा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्ती शिथिल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.


इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरण्यासाठी आधार नोंदणी अनिवार्य केली आहे.  शिक्षण संचालकांनी फतवा काढून ३० सप्टेंबर पर्यंत आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी आधार क्रमांक नोंदणीचे काम अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी दिसतील. कोरोना व्हायरस मुळे शाळा बंद आहेत.विद्यार्थीपालकांशी प्रत्यक्ष संपर्क नाही. अनेक विद्यार्थी अद्यापही बाहेर गावी आहेत.व्हाट्सअपफोन द्वारे संपर्क केला जात आहे. पालकांना आधार कार्ड काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आधार कार्ड नोंदणी सक्तीचीकेल्यामुळे वेळेवर पूर्ण नोंदणी झाली नाही तर शाळेच्या मूळ पटसंख्येत तफावत दिसेल पुढे शाळांना अनेक अडचणी येतील म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी शिक्षण संचालकांशी चर्चा केली. याबाबत कल्याण महानगराचे कार्यवाह गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय व  शिक्षण मंत्र्यांना ई-मेल द्वारे आधार कार्ड सक्ती शिथिल कारण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments