कचर्‍याच्या ढिगार्‍यात आभाराचा उपहासात्मक फलक

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कचऱ्यावर अतिरिक्त कर लादणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे कचरा उचलण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले असून सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याने टिटवाळा एज्युकेशनल फाउंडेशन अभिनव उपक्रम राबवित कचर्‍याच्या ढिगार्‍यावर आभाराचे उपहासात्मक फलक झळकवित नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांकडून विविध स्वरूपाचा कर घेत असताना नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्यांवर दररोज पडत असलेला कचराघंटागाडीची अनियमितता अनेक सोसायटयांमधील व गृहसंकुलना बाहेर साचत असणारा कचरा याबाबत सतत बोंबाबोंब असल्याने त्यातच सफाई कामगारांकडून होत असणारी कामकुचराई  यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात टिटवाळा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय देशेकर यांनी साचत असणाऱ्या कचर्‍याच्या ढिगार्‍याकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. टिटवाळयातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने नव्याने उभारलेल्या  रुक्मिणी प्लाझा हॉस्पिटल समोरच कचर्‍याचा ढिगारा साचल्याने याबाबत या कचर्यावर प्रशासनाचे आभार व्यक्त करणारा उपहासात्मक निषेधाचा फलक उभा करून अनोखे आंदोलन देशेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments