टीसीएल क्रिकेट फेस्टिव्हल २०२१ चे आयोजन
मुंबई, २० सप्टेंबर २०२१ : जागतिक टॉप २ टीव्ही कॉर्पोरेशन आणि सनरायझर्स हैदराबादचे अधिकृत प्रायोजक टीसीएल लकी ड्रॉ महोत्सवासह टीसीएल क्रिकेट फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजित हा महोत्सव आयपीएलच्या चौदाव्या सत्रातील सुनिश्चित विजेता मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. मानव हस्तक्षेप विरहीत पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे भाग्यवान लकी ड्रॉ विजेत्यांची निवड केली जाईल. टीसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि टीसीएल क्रिकेट फेस्टिव्हलदरम्यान दर आठवड्याला सोशल मीडिया हँडल्सवर विजेत्यांची घोषणा केली जाईल.       टीसीएल क्रिकेट फेस्टिव्हल २०२१ मध्ये, लकी ड्रॉ ठरलेल्या वेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे केला जाईल. रोमांचक सवलती आणि ऑफरसोबतच भाग्यवान ग्राहकांना काही सोप्या पद्धतींचा अवलंब करत आकर्षक लाभ मिळविण्याची संधी देखील आहे. ग्राहकांना ऑनलाइन चॅनेलद्वारे प्रगत टीव्ही तंत्रज्ञान आणि मोहक डिझाइन्ससह समाकलित टीसीएल उत्पादने खरेदी करायची असतील, तर त्यांनी त्वरित टीसीएल डॉटकॉम या लिंकवर क्लिक करावी आणि ऑफलाइन चॅनेल्ससाठी त्यांना ऑफलाइन स्टोअर स्टँडीमध्ये उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
        टीसीएल इंडियाचे मार्केटिंग हेड जस्टिन झोंग म्हणाले, "लकी ड्रॉ मोहिमेच्या अंगभूत गुणासह, हा संपूर्ण उत्सव हंगाम असंख्य कृती कार्यक्रमांनी भरगच्च असल्याने ग्राहकांना असंख्य मार्गांनी फायदा मिळू शकतो. टीसीएलने नेहमीच योग्य किंमतीच्या श्रेणीवर उत्कृष्ट टीव्ही तंत्रज्ञान प्रदान करण्यात विश्वास ठेवतो.परंतु, हे उत्सव ग्राहकांना ऑफर आणि सवलती प्रदान करण्यासाठी खास तयार केले जातात जे आयुष्यात एकदा संधी देतात. आम्हाला आशा आहे की आमचे ग्राहक या गोष्टींचा जितका आनंद घेतील, तितक्याच आम्ही त्यांच्यासाठी योजना आखू."

Post a Comment

0 Comments