आता तरी शाळेची घंटा वाजू दे.. डॉ. राजकुमार कोल्हे यांची सरकारकडे मागणी


 डोंबिवली ( शंकर जाधव )  मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. लाखो शिक्षक कर्मचारी यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारला खास विनंती आहे आता तरी शाळा उघडाआता तरी महाविद्यालय उघडा. आपण आपल्या शाळेत प्रत्येक ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल म्हणून शाखा ठेवू तसेच कोरंटाईन करण्याकरता वेगळी व्यवस्था ठेवू. 
          हा संकल्प सुरुवातीपासून होता आणि तसा आमच्या शाळेत ठेवला आहे. सरकारने परवानगी दिली तर आम्ही शाळा उघडण्यात तयार आहोत असे वक्तव्य जन गण मन शाळेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सेवा संस्कृती पुरस्कार कार्यक्रमात  केले.

       जानवी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील जन गण मन शाळेत कोरोना योधांचा सेवा गौरव पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी डॉ. राजकुमार कोल्हे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थापक सदस्या प्रेरणा कोल्हे जानवी फाऊंडेशनच्या संस्थापिका जानवी कोल्हे तसेच जन गण मन शाळेतील शिक्षक वर्ग व पदाधिकारी उपस्थित होते. अनेक आक्रोश चिंचाळा कोरोना काळात दिसून येत होत्या. 
        अशा वेळी हे पडद्यामागील लोक आपल्या कर्तव्याचे पालन करत होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून जान्हवी फाऊंडेशनचे डॉ. कोल्हे आणि कुटुंबीय तर्फे सेवा संस्कृती पुरस्कार देऊन कोरोना योध्याचा गौरव केला.याप्रसंगी पत्रकार शंकर जाधव, प्रशांत जोशी, नरेंद्र थोरवडे,शरद शहाणे,वासुदेवन मेनन, संतोष सावंत, विजय लेले आदी पत्रकारांचा डॉ. कोल्हे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.          यावेळी डॉ. कोल्हे म्हणालेशैक्षणिक संस्था हे कमाईचे साधन नाही हे मनाची धरून या संस्थेची स्थापना केली. आणि हेच ध्येय आहे. संस्थेच्या माध्यमातून पाचशे मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया झाली. अनेक लोकांना शिक्षणासाठी मदत केली आहे. कोरोना काळात आमच्याकडे काहीच भीतीचे वातावरण नव्हते पण तरी जे सरकारचे नियम होते त्या प्रमाने काम सुरू होतं. आमच्या येथे प्रत्येक व्यक्तीला मानसिक मजबूत ठेवल आहे. 

          कोरोना नाही असा संदेश लोकांना देऊन त्याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रचार केला. कोरोना एक फ्ल्यू आहे. कोरोनामुळे जास्त लोक मृत्यू झाले नाही तर भीतीमुळे लोकांचा जीव गेला कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या कमी आहे तर भीतीमुळे संख्या जास्त झाली ती भीती घालवता कशी येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कोरोनाची भीती बाळगू नका सरकारी नियम आहे ते अवश्य बाळा पण भीती बाळगू नका प्रत्येक शंभर वर्षांनी असे फ्ल्यू येतात आणि निघून जातात पण दरम्यान मनस्ताप होतात.
       

          यावेळी जान्हवी कोल्हे म्हणाल्याआमच्या शाळेत पूर परिस्थितीत पूरग्रस्तांची सोय करण्यात आली होती. लसीकरण ही सुरू आहे त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे की कोरोना काळात कोणी कोणी कसं काम केले
 

         समाजासाठी कसं काम केलं. आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष पडद्यावर कार्यरत असणाऱ्या चित्रपट सृष्टीतील लोकांना पाहतो पण महामारीच्या काळात पडद्यामागे राहून जेवण औषधे देऊन कोणत्या व्यक्ती कार्यरत असतात हेच समाजासमोर आणून त्यांचा गौरव करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर प्रेरणा कोल्हे म्हणाल्याआपण पडद्यावरची हिरो पाहत असतो पण जे पडद्याआड काम करणारे लोक असतात त्यांना कौतुकाची थाप देण्याची गरज आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम होता.

Post a Comment

0 Comments