संत निरंकारी मिशन आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात १६६ नागरिक लाभान्वित
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवनवागळे इस्टेटठाणे येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात १६६ नागरिक लाभान्वित झाले. ज्यामध्ये निरंकारी भक्तांशिवाय स्थानिक झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरजू नागरिकांचा समावेश होता. 

नेत्र तपासणी करत असताना एकंदर ६० नागरिकांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यांना मोफत मोतीबिंदु ऑपरेशन साठी नायर हॉस्पिटलमुंबई येथे पाठविण्यात आले. या गरजू नागरिकांना नायर हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली. शिबिरामध्ये आवश्यक औषधे तसेच चश्मे देखिल वितरीत करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्रेमा ओबेरॉय यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नामदेव वाडेकरबाबूभाई पांचालडॉ.आर.एस.यादवप्रकाश जोशी आदि गणमान्य व्यक्ति उपस्थित होत्या. या प्रसंगी ओबेरॉय यांनी या शिबिराचा उद्देश आणि कार्यप्रणाली समजावून सांगितला तर अन्य मान्यवरांनी या आयोजनामागे वर्तमान निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निष्काम मानव सेवेच्या शिकवणूकीतून प्राप्त झालेल्या प्रेरणेचा हात असल्याचे सांगितले.
            शिबिरामध्ये नायर हॉस्पिटलचे डॉक्टर्स व तंत्र सहायकांच्या टीमने आपल्या सेवा अर्पित केल्या ज्यामध्ये डॉ.वंदनाडॉ.सुभी आणि डॉ.भारती यांचा समावेश होता. या शिबिराचे यशस्वी आयोजन संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक सुभाष भोसले यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने केले.

Post a Comment

0 Comments