Header AD

तीन दिवसात ३०० भटक्या श्वानांना टोचली रेबीजची लस

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  रोटरी आणि रोटरक्ट क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियारोट्रॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई इंडस्ट्रीयल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीपलावाखारघर आणि बदलापूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले. सुमारे ३०० च्या वर भटक्या जनावरांना ही लस टोचन्यात आली. डॉ. नितेश पुरोडॉ.जयेश गीतेडॉ. देवेंद्र बिरजानियाडॉ. दिव्या इंगळे आणि रोटरी तर्फे अध्यक्ष राजीव दिवाणप्रवीण चौधरी तसेच पॉज संस्थेचे निलेश भणगेग्लेन अलमेडा आणि राज मारू ह्यांनी विशेष मेहनत घेतली. तीन दिवस सुमारे ४५ कार्यकर्ते आणि  डॉक्टरांनी स्वेच्छेने रेबीज लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवली.
  

           याबाबत पॉज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांनी रेबीज लस बाबत माहिती दिली. रेबिज रोगाविषयी लोकजागरण व्हावे  त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषधउपलब्ध असावे  या हेतूने २००७ पासून '२८ सप्टेंबर' हा दिवस  मानला जातो. रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत.या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीमकुत्र्यांचे नपुसंकीकरणधावण्याच्या स्पर्धा (रन फॉर रॅबिज)कवायतीशैक्षणिक सभासत्रेविविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात.पहिल्या रेबिज दिनाच्या कार्यक्रमावेळी ७४ देशांतील ४ लाख लोकांनी भाग घेतला होता. 

         त्यावरून रेबिज रोगाचा सर्वसामान्य माणसाने किती धसका घेतलेला असतो  हे लक्षात येते. एकत्रित येऊन रेबिजला भूतकाळात गाडाया सूत्राने विश्व रेबिज दिनाचे सोहळे आयोजित होतात.रेबिज हा रोग बरा होतोतरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवर्षी जगभरात ५२,५६० जण रेबिजमुळे दगावतात. यात जास्त करून १५ वर्षाखालील मुलांचा असतो. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते.

       कारण या औषधाची किंमत गरीबांना परवडणारी नसते. जगातील बर्‍याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी  जास्त मृत्यू  रेबी कुत्रा चावल्यामुळे होताततर आफ्रिका आणि आशिया सुधा याचे प्रमाण जास्त आहे. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो.

तीन दिवसात ३०० भटक्या श्वानांना टोचली रेबीजची लस तीन दिवसात ३०० भटक्या श्वानांना टोचली रेबीजची लस Reviewed by News1 Marathi on September 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads