इंटकचा अनोखा उपक्रम:238 विद्यार्थी पालकांचा घरि जाऊन केला सन्मान दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
ठाणे , प्रतिनिधी  : विद्यार्थी पालकांचा वेळ वाचावा व त्याचा उचीत सन्मान व्हावा यासाठी ठाणे काँग्रेस व जिल्हा इंटकच्या सयुंक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 22 मधील 238 विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा त्यांच्याच घरी जाऊन सत्कार केला. दहावी -बारावीचा निकाल लागल्यानंतर सगळीकडे विविध संस्था  ,राजकीय पक्षांकडून शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या कार्यक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा काही निकषावर  सन्मान करण्यात येतो.            परंतु मागील पाच वर्षांपासून जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे व त्यांच्या सहका-यांनी या सर्व बाबी बाजूला सारून प्रभाग क्रमांक 22 मधील दहावी व बारावीत यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणा-या पालकांचा सत्कार त्यांच्याच घरी जाऊन त्याना शैक्षणिक वस्तु भेट म्हणून देण्यात येत आहे.यावर्षी कोरोना पार्श्‍वभूमीवर सर्व नियम पाळून दहावीमधील 195 विद्यार्थी व 43 बारावी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच घरी जाऊन सन्मानित करण्यात आले आहे.        या विषयावर बोलताना सचिन शिंदे यांनी सागितले की,दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वत्र टक्केवारीचे निकष पाळून विविध संस्था व राजकीय पक्ष या मुलांचे सत्कार समारंभ आयोजित करतात या वर्षी हे कार्यक्रम कमी झाले असले तरी मागील 5 वर्षांपासूनच जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून दहावी-बारावीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याच्या घरि जाऊन सन्मानित करण्यात येत आहे.          कारण निकाल लागल्या नंतर विद्यार्थ्यी हे त्याचे अ‍ॅडमिशन व त्याला लागणारे पेपर यासाठी धावपळ करित असतो अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांची व पालकाची वेळ घेऊनच आम्ही त्यांच्या घरि जातो,जेणेकरून त्याचा सन्मानही होईल व त्याची व पालकांचा वेळही वाचतो यावर्षी विविध भागातून आलेल्या 238 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले असूनही काही नावे येतच असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.


Post a Comment

0 Comments