प्रभाग क्रमांक 23 येथे नगरसेविका प्रमिलाताई केणी यांच्या वतीने मोफत लसीकरण


कळवा, अशोक घाग :  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेविका माजी विरोधी पक्ष नेत्या श्रीमती प्रमिलाताई मुकुंद केणी व मंदार केणी यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 23 येथे 45 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले
           कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 येथील बुधाजी नगर गांधिनगर राणा टॉवर भुसार आळी. गाव देवी परिसर रेल्वे कॉलनी या परिसरातील नागरिकांचे जास्त जास्त लसीकरण करून घेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे याप्रसंगी नगरसेविका प्रमिलाताई म्हणाला की जून महिन्यामध्ये आम्ही जुपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.            प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आला होता आणि बाकी उरलेली रक्कम आधार सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली होती जवळ जवळ दोन ते अडीच हजार नागरिकांनी त्यावेळेस त्या शिबिराचा लाभ घेतला होता नंतर नागरिकांनी मागणी केली की पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करण्यात यावे त्यानुसार आम्ही महानगरपालिकेची पत्रव्यवहार करून आमच्या प्रभागांमध्ये मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे माझा प्रभाग माझ्या नागरिकांची सुरक्षा याच भावनेने या शिबिराचे आज आयोजन करण्यात आलेले आहे 

Post a Comment

0 Comments