भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी शहरात महानगरपालिकेच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली, याचे उद्घाटन पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कारभारी खरात यांच्या हस्ते इंदिरा गांधी रुग्णालयाच्या आवारात पार पडले. यावेळेला डॉक्टर खरात यांनी पल्स पोलिओ मोहीम किती आवश्यक आहे हे नमूद केले.
पोलिओ झाल्यावर काय होते हे आपणास ठाऊक आहे त्याचे मानवावर, कुटुंबावर , समाजावर होणारे परिणाम आपण पाहत आहोत पोलिओ पासून सुरक्षित राहावयाचे असेल तर, त्यासाठी पल्स पोलिओचा डोस प्रत्येक बाळाला देणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व परिवारातील सर्व 0 ते 5 वयोगटातील सर्व लहान मुलांना पल्स पोलिओ लस देऊन आपल शहर पोलिओ मुक्त करावयाचे आहे.
आज सर्व लसीकरण केंद्रावर पोलिओ लस देण्यात येणार आहे,उद्यापासून पुढील पाच दिवस लसीकरण करणेकरिता पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरी येतील यावेळी सर्व नागरिकांनी, सामाजिक, धार्मिक संस्थांनी पुढाकार घेऊन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर खरात यांनी याप्रसंगी केले.भिवंडी शहर पोलिओ मुक्त करण्याचा आपला संकल्प आहे तो आपण पूर्ण करावयाचा आहे.
0 Comments