कोपर पुल वाह्तुकीसाठी लवकर सुरु न केल्यास आंदोलन करू कॉंग्रेसचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) गेली दोन वर्ष रेल्वेने वाहतुकीसाठी बंद असलेल्या कोपर पुल गणेशोत्सवाआधी सुरु  होईल अशी सर्वाना अपेक्षा आहे.काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी सदर पुलाच्या कामाची पाहणी केली होती.आता कॉंग्रेसने या पुलाची पाहणी केल्यावर अजून पुलाचे काम पूर्ण होण्यास महिना लागणार आहे.त्यामुळे  गणेशोत्सवाआधी हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार नाही अशी माहिती कॉंग्रेसच्या कल्याण-डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिम अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.कोपर पुल लवकर सुरु न केल्यास आंदोलन करू असा इशारा यावेळी कॉंग्रेसने दिला.      कोपर पुल धोकादायक झाल्याने १८ सप्टेंबर २०१८ कोपर पुल रेल्वे प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता.कोरो ना काळात या पुलाचे काम युद्धपातळीवर केल्याने हा पुल लवकर २०२१ साली सुरु होईल अशी डोंबिवलीकरांना अपेक्षा होती. मात्र डोंबिवलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पालिका प्रशासन कमी पडल्याचे दिसते.या पुलाचे काम गणेशोत्सवाआधी पूर्ण होऊन आतातरी विघ्न दूरू होईल अशी अशा होती. माहिती कॉंग्रेसच्या कल्याण-डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिम अध्यक्ष संजय पाटील,उपाध्यक्ष राजू सोनी, श्रीनिवृत्ती जोशी, भरत शेलार,निशिकांत रानडे, सचिन धुरी, तेजस गडकरी आदींनी सदर पुलाच्या कामाची पाहणी केली.        काम अजून पूर्ण झाले नसून काही तांत्रिक कामे बाकी असल्याने असल्याची माहिती कॉग्रेस पदाधिकाऱ्यांना मिळाली. यावर कॉंग्रेसने प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या कल्याण-डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली पश्चिम अध्यक्ष पाटील म्हणाले,कोपर पुलाचे कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल  आम्ही त्यांचे आभार मानतो.
        प्रशासनाने गणेशोत्सवआधी कोपर पूल वाहतुकीसाठी खुला होईल यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र अजून महिनाभर तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार नाही.त्यामुळे प्रशासनाने `तारीख पे तारीख` न देता लवकरात लवकर हा पूल खुला करावा अन्यथा कॉंग्रेस आंदोलन करील असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments