टिटवाळ्यात योगासने करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे : हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा सर्व भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमत्ताने देशभरात विविध क्रीडा स्पर्धाशिबिरे तसेच व्याख्यान आयोजीत करण्यात येतात. याच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सिद्धीविनायक युवा संस्था टिटवाळा आणि विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन यांच्या वतीने टिटवाळ्यातील नागरिकांसाठी मोफत योगा प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सदर प्रशिक्षण देण्यात आले.राज्य पुरस्कार विजेते विनायक कोळी व क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व सहभागी युवक व युवतींना योग प्रशिक्षण दिले व राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक प्रवीण साबळे यांच्या सोबत कृतिका कोळी आणि आदर्श मौर्य यांनी अद्यावत योगासने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पुढील येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन हे खेळाडू टिटवाळा शहराचे नाव लौकिक वाढवतील अशी सर्वांना आशा आहे.

Post a Comment

0 Comments