राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्यातून गुण घेऊन आपलं आयुष्य समृद्ध करावं - वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले


■लो. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची ऑनलाइन जयंती साजरी राहनाळ जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतांना या राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्यातून आपण एखादा तरी गुण घेऊन आपलं आयुष्य समृद्ध करावेआपण सातत्याने देशसेवेचा आणि समाजसेवेचा विचार करावाअसे मार्गदर्शन पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले यांनी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना केले.जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ या शाळेने 'शाळा बंद पण शिक्षण सुरूया उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याची महती सांगणारी भाषणे सादर केली. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. देशसेवेसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचले. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून सार्वजनिक गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. अशा पद्धतीची भाषणे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केली.तर सिद्धी देसाई या विद्यार्थिनींना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांचीच महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती विषयाची कविता सादर करून वाहवा मिळवली. राहनाळ शाळेच्या शिक्षिका संध्या जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शिक्षिका रसिका पाटीलअनघा दळवी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचा कथा सांगितल्या. त्यांच्या जीवन कार्याचे महत्त्व महत्त्व सांगितले. तसेच अण्णाभाऊ साठे यांचे कार्याचे माहिती दिली. आँनलाईन कार्यक्रमाची संकल्पना आणि सूत्रसंचालन अजय पाटील यांची होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चित्रा पाटील यांनी केले. ऑनलाइन पद्धतीने सादर झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.


Post a Comment

0 Comments