स्टेशनबाहेर विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
डोंबिवली (शंकर जाधव )  डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांकडे परवाना नसल्याने मंगळवारी डोंबिवली वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.या ठिकाणी १८ रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलिसांनी परवाना विचारला असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले.            वाहतूक पोलिसांनी अश्या रिक्षा वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या आवारात आणल्या होत्या. विना परवाना  रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रत्येकी ५०० रुपये व गणवेश परिधान न करणे असे 200 रुपये असे  700  असे एकूण 18 रिक्षाचालकांकडून 12, 600 रुपये इतका दंड आकारण्यात आला.

Post a Comment

0 Comments