केडीएमसीने कोरोना रुग्णालयात नेमलेल्या ऑडीटर्स मुळे रुग्णांना दिलासा

 

खाजगी रुग्णालयांनी जास्त आकारलेले ६९ लाख रुपये रुग्णांना परत

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना काळात कल्याण डोबीवली शहरातील खाजगी रुग्णालयांनी उपचाराची भरमसाठ बिले आकारून रुग्णांना लुटण्याचा सपाटा लावल्याची ओरड होत होती. त्याची दखल घेत शासन स्तरावरून खाजगी रुग्णालयाच्या बिलांचे ऑडीट करण्याचे आदेश निघाले. कोविड-१९ चा पहिल्या लाटेत २२ खाजगी रुग्णालयांकडून ४५ लाख ५ हजार ४४० रुपये तर दुसऱ्या लाटेत २५ खाजगी रुग्णालयांकडून २३ लाख ८० हजार ५६६ अशा एकूण ६८ लाख ८६ हजार ६ रुपये जादा लावल्याचे आक्षेप महापालिकेने नियुक्त केलेल्या ऑडीटर्सनी घेतले होते. या आक्षेपित रक्कमांचा जवळपास पूर्ण परतावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.कोविड-१९ ची पहिली लाट आली असताना खाजगी रुग्णालयांकडून कोविड-१९ च्या रुग्णांकडून मनमानीपणे भरमसाठ बिले लावून त्त्यांची लुट करण्यात येत असल्याचे समोर आले. अनेक रुग्णांकडून लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा बिले आकारली गेली. त्याविरोधात ओरड होताच खाजगी रुग्णालयांच्या या मनमानीला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने बिलांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश सबंधित विभागांना दिले. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने देखील त्यानुसार प्रभाग क्षेत्रनिहाय ऑडीटर्स नेमून खाजगी रुग्णालये आकारात असलेल्या बिलांची तपासणी केली.त्यानंतर कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत देखील याचप्रकारे खाजगी रुग्णालये आकारात असलेल्या बिलांची तपासणी करून जादा लावण्यात आलेल्या बिलांमधील आक्षेपित रक्कमा निश्चित करून रुग्णांना त्या रक्कमेचा परतावा देण्याचे सूचित केले गेले. त्यानुसार कोविड-१९ च्या महामारीत आतापर्यंत आक्षेप घेण्यात आलेले एकूण ६८ लाख ८६ हजार ६ रुपये सबंधित रुग्णालयांनी परत केल्याची माहिती महापालिकेचे कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांनी दिली आहे.पहिल्या लाटेदरम्यान खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना भरमसाठ बिले आकारण्यात येत असल्याची ओरड होऊ लागली. शासनामार्फत त्याची दखल घेण्यात आली व रुग्णालयांकडून कोविड रुग्णांना आकारल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडीटर्स नियुक्त करण्यात आले. पहिल्या लाटेच्या काळात आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ बिलांवर दुसऱ्या लाटेच्या काळात काही प्रमाणात जादा बिले आकारण्याच्या खाजगी रुग्णालयांच्या प्रवृत्तीला चाप बसला. परिणामी दुसऱ्या लाटेच्या काळात जादा बिले आकारण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.पहिल्या लाटेच्या अखेरच्या टप्प्यात २२ खाजगी रुग्णालयांकडून तपासणी केलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातील रुग्णालयनिहाय कंसात आक्षेपित बिलांची संख्या व एकूण आक्षेपित रक्कम पुढीलप्रमाणे: ऑप्टीलाईफ हॉस्पिटल (१३) ७९९१००/-साई हॉस्पिटल (२२) ७४५३०८/-स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (७) २७५०२०/-ए अँड जी हॉस्पिटल (२९)  १०५६९६८/-नाहर हॉस्पिटल (४३) ४२६१५१/-मेडीहोप हॉस्पिटल (१) ५२०००/-सिद्धिविनायक हॉस्पिटल (१५) ८७९२००/-श्वास हॉस्पिटल (-) १४८२००/-ऑप्टीलाईफ एन एक्स हॉस्पिटल (३२) ३६३४५०/-स्वामी समर्थ हॉस्पिटल (३६) ११००४६०/-साई आरोग्यम (१३) १२६३००/-आयुष हॉस्पिटल (७) २५५३००/-नोबेल हॉस्पिटल (४१) ११७८१५०/-श्रीदेवी हॉस्पिटल (५) २८१३४३/-आयकॉन हॉस्पिटल (५) ६५७५०/-ऊमादेवी हॉस्पिटल (९) ७२००/-सी.बी. वैद्य हॉस्पिटल (६) १५२९५०/-मिरा हॉस्पिटल (८) ३५१००/-ऑक्सिलियम हॉस्पिटल (१) २६५००/-शिवम हॉस्पिटल (१) ९८२५०/-श्री गजानन हॉस्पिटल (२) ३६००००/-एएम पीएम २४ तास हॉस्पिटल (१) ७२७४०/- अशाप्रकारे कोविड-१९ चा पहिल्या टप्प्यात २२ खाजगी रुग्णालयांकडून ४५ लाख ५ हजार ४४० रुपये जादा आकारण्यात आल्याचे ऑडीटर्सच्या तपासणीत दिसून आले.तर दुसऱ्या लाटेदरम्यान कल्याण-डोंबिवली शहरातील २५ खाजगी रुग्णालयांनी जादा बिले लावल्याप्रकरणी ऑडीटर्सनी केलेल्या तपासणीत आढळून आलेली रुग्णालयनिहाय एकूण आक्षेपित रक्कमा पुढीलप्रमाणे: मिरा हॉस्पिटल १४९८७०/-,  डॉ. सी. बी. वैद्य हॉस्पिटल २१२८००/-आयकॉन हॉस्पिटल १४०५०/-आयुर हॉस्पिटल १५५३५०/-वैभव हॉस्पिटल १३८९००/-रुबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल २०६००/-ए अँड जी हॉस्पिटल ४१४३००/-स्वामी कृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल १८८३५/-मेडीकेअर हॉस्पिटल १३६००/-लिलावती हॉस्पिटल १५८५००/-सुर्या हॉस्पिटल १६३१०१/-सुमन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल १६४६२०/-साई अमृत हॉस्पिटल ९४७७/-गणेश मेमोरियल हॉस्पिटल २३३००/-श्री सद्गुरूकृपा हॉस्पिटल ३१२००/-साई स्वस्तिक हॉस्पिटल २९०००/-साईधाम हॉस्पिटल ४८१००/-ओम हॉस्पिटल ४०००/-श्री तिसाई हॉस्पिटल ४९०००/-चैतन्य नर्सिंग होम ३४२००/-गुरुकृपा क्रिटीकेअर १९०९००/-बालाजी हॉस्पिटल ११९००/-लाईफ केअर हॉस्पिटल २०६००१/-स्पेक्ट्रम ११५५६२/-साई संजीवनी क्रिटीकेअर ३४००/-. अशाप्रकारे दुसऱ्या लाटेत २५ खाजगी रुग्णालयांकडून २३ लाख ८० हजार ५६६ असे एकूण ६८ लाख ८६ हजार ६ रुपये अशा जादा लावल्याचे आक्षेप घेण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments