घरफोड्यातील फरार आरोपी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या जाळ्यात

  

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली जवळील सोनार पाडा येथील डी.एस.एजन्सी नावाचे गोडाऊन मध्ये घरफोड्यातील  फरार आरोपी आकाश ऊर्फ बाटल्या राजू सिंग ( २१ ) हा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या जाळ्यात अडकला.बदलापूर येथील खरवई गाव येथील अनंत शिंगटे चाळीत राहणार्या याआरोपीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

     अटक आरोपीवर बदलापूर पोलीस ठाण्यात ३ तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ३ तर डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यात १ गुन्हे दाखल आहेत. आकाश ऊर्फ बाटल्या हा घरफोडी करताना त्याच्या जवळ तीक्ष्ण धारदार हत्यार बाळगतो.अटक आरोपीला सदर आरोपीस कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला  दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

         गुन्हे शाखा घटक-३कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटीलसपोनि भूषण एम.दायमापोउनि मोहन कळमकरपोहवा दत्ताराम भोसलेमिथुन राठोडअरविंद पवारसंदीप भालेरावराजेंद्र खिलारेप्रकाश पाटील,सचिन साळवीमंगेश शिर्केगोरक्ष शेकडेगुरुनाथ जरगराहुल ईशीचित्रा इरपाचेस्वाती काळे यांनी कामगिरी यशस्वी केली.

Post a Comment

0 Comments