Header AD

सार्वजनिक वाचनालया तर्फे "जागतिक ग्रंथपाल दिन" साजरा

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. १२ ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस "जागतिक ग्रंथपाल दिन" म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रंथसखा वाचनालयाच्या ग्रंथपाल अर्चना कर्णिक व वाचन मंदिरच्या ग्रंथपाल सुजाता वडके उपस्थित होत्या.
ग्रंथपाल हा वाचक आणि लेखक यांमधील दुवा आहे. बदलत्या काळानुसार एखाद्या डॉक्टर प्रमाणे वाचकाची नस ओळखून त्यांना आवश्यक असलेले पुस्तक देऊन त्यांची वाचनाची व अभ्यासाची भूक ग्रंथपालाने भागवली पाहिजे असे प्रतिपादन अर्चना कर्णिक यांनी केले.  सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे अर्चना कर्णिकसुजाता वडके, वाचनालयाच्या २७ वर्षे अविरत सेवा देणा-या ग्रंथपाल गौरी देवळे व सहय्यक ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी ग्रंथसखा वाचनालयाचे शाम जोशी, वाचनालयाचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्करकार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपीनिलिमा नरेगलकर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यकमाचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे "भारत माझा देश आहे" या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तींच्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले होते. 

 १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याण च्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. भारतीय स्वातंत्र्यदिनी ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या वाचनालयाच्या वास्तुत आज मला बोलण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन  रोटरी क्लब ऑफ़ कल्याणचे अध्यक्ष अरुण सपकाळे यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या सेक्रेटरी सुषमा पटेल उपस्थित होते.

सार्वजनिक वाचनालया तर्फे "जागतिक ग्रंथपाल दिन" साजरा सार्वजनिक वाचनालया तर्फे "जागतिक ग्रंथपाल दिन" साजरा Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads