भिवंडीत ओला कार चालकाची गळा आवळून हत्या ,कार मध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ...

भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) मुंबई-नाशिक महामार्गा वरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली नाका येथे एका कार मध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभी असलेली व्हॅगनार कार मध्ये कार चालकाचा मृतदेह आढळून आला .        या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांची तपासणी केली असता मृतदेहाच्या गळ्या भोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे .
            प्रभाकर पांडू गंजी वय 42 वर्ष असे मयताचे नाव असून तो पद्मा नगर - भिवंडी येथील रहिवासी आहे .यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना लॉक डाऊन मुळे काम बंद असल्याने आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःची  व्हॅगनार कार ओला मध्ये लावून स्वतः ड्रायव्हर म्हणून व्यवसाय मागील एक महिन्या पासून सुरू केला होता.

 

              सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात रवाना करीत नारपोली पोलिसांनी अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे .

Post a Comment

0 Comments