शिवसेना विभाग प्रमुख सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने २२०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : माझे कुटुंब माझी जबाबदारी या सरकारच्या संकल्पनेतून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शिवसेना विभागप्रमुख, माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका शालिनी वायले यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील वायले नगर परिसरामध्ये आतापर्यंत  विविध लसीकरण शिबिरांत बाविशेहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  आपल्या विभागात १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी सुनील वायले प्रयत्नशील असून प्रभाग क्र. १ उंबर्डे, प्रभाग क्र. २ कोळीवली, प्रभाग क्र. ३ गंधारे आणि प्रभाग क्र. १९ वायले नगर आदी परिसरातील  नागरिकांच्या सुविधेसाठी आतापर्यंत विविध ठिकाणी मोफत लसीकरण शिबीर आयोजित केले आहेत. सध्या वायले नगर येथील पोद्दार स्कूल येथे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यंत बाविशेहून अधिक नागरिकांचे यामध्ये लसीकरण करण्यात आले आहे.सध्याची परिस्थिती पाहता रेल्वेमॉल अश्या अनेक ठिकाणी लसीकरणाचे दोन डोस अनिवार्य ठरत आहेत. कोरोनाचे संकट अजूनही आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून पुढील आयुष्यात कोरोनाची लागण होणार नसल्याचे सुनिल वायले यांनी सांगितले. आयोजित शिबिरात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला वेळेवर लस उपलब्ध होत नाही यामध्ये नागरिकांचा वेळही खर्च होतो हे लक्षात घेता सुनिल वायले यांनी नागरिकांसाठी लसीकरण प्रभागात उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार टोकन वाटप करून हे लसीकरण सुरु आहे. या शिबीरात नागरिकांच्या सोयीसाठी निलेश सकपाळनिलेश पाटीलराजेश लोंढेप्रमोद सोजावणे, सचिन रांजणे, प्रतिक चौधरीरेवा गोटमेअरुण साबतअनंत  गायकवाड आदीजण सुनिल वायले व शालिनी वायले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments