नारायण राणेंनी कल्याण पूर्वेत जनआशीर्वाद यात्रा काढून दाखवावी – नगरसेवक महेश गायकवाड


■कल्याणात  पूर्वेत राणेंच्या  पुतळ्याला चप्पलेच हा घालत, कोंबड्या उडवत शिवसेनेची निदर्शने...


कल्याण , कुणाल म्हात्रे  : नारायण राणे वारंवार प्रक्षोभक भाष्य करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नारायण राणेंनी कल्याण पूर्वेत जनआशीर्वाद यात्रा काढून दाखवावी, शिवसैनिक तुमचा चांगला समाचार घेतील असा इशारा कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.  कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला. यावेळी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह सेनेच्या पदाधिका-यांनी " कोंबडीचोर" असे म्हणत कोंबड्या भिरकावल्यायावेळी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शरद पावशे, कैलास शिंदेसुमेध हुमणेदत्ता शिंदेशाखाप्रमुख प्रशांत बोटेयुवा सेना अधिकारी निलेश रसाळ,महिला विभागप्रमुख वंदना तांबे आणि महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.             गेल्या एक महिन्यापासून नारायण राणे बेछुट वक्तव्य करत असून भाजपाला राज्य आणि देश बुडवायचे असेल तर त्यांनी नारायण राणे यांना पंतप्रधान करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गैरवक्तव्य केल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाही. पेट्रोल, डीझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असून जनता महागाईने त्रस्त असतांना जनआशीर्वाद यात्रा काढून भाजपावाले जनतेचे शाप घेत आहेत.           नारायण राणे यांनी कल्याण पूर्वेत जनआशीर्वाद काढून दाखवावी शिवसैनिक तुमचा चांगला समाचार घेतील असा इशारा कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.  

Post a Comment

0 Comments