Header AD

केडीएमसी क्षेत्रात दिल्ली प्रमाणे सुविधा देण्याचे आम आदमी पक्षाचे आश्वासन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता दिल्यास दिल्लीप्रमाणे नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आम आदमी पक्षाने दिले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्याप्रसंगी बोलताना आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिले आहे.आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा सर्वच राजकीय पक्षांपुढे मांडला आहे. दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजना आज जनतेच्या कौतुकाच्या व प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांची तुलना खासगी शाळांसोबत केली जात आहे. त्याचबरोबर घरपोच दाखले- प्रमाणपत्रे२०० युनिट मोफत वीजमोफत पाणी अशा सुविधांची गेल्या १० वर्षांपासून अंमलबजावणी केली जात असल्याचेही राचुरे यांनी सांगितले.आजपर्यंत देशात अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता आणि धाडस दाखवले नसून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यास कल्याण डोंबिवलीतही दिल्ली मॉडेल राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. इथल्या जनतेने आतापर्यंत भाजपशिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतला असून एकाही पक्षाने 'आप'प्रमाणे स्वच्छ कारभार केलेला नसल्याचे यावेळी प्रदेश निरिक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 'आप'ची सत्ता आल्यास मोफत पाणी, महिला - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते, महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणार. फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणार. महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


केडीएमसी क्षेत्रात दिल्ली प्रमाणे सुविधा देण्याचे आम आदमी पक्षाचे आश्वासन केडीएमसी क्षेत्रात दिल्ली प्रमाणे सुविधा देण्याचे आम आदमी पक्षाचे आश्वासन Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads