शिवसेनेच्या वतीने महाडमधील पूरग्रस्त गावांना भरीव अशी मदत


■नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले जाधव याच्या पुढाकाराने मदत...


ठाणे , प्रतिनिधी  : कोकणातील महाड,चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा ओघ हा सुरूच आहे नगरसेवक विकास रेपाळे आणि वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले जाधव यांच्याकडून महाड मधील विविध गावात महिलांना आवश्यक असलेल्या वस्तू,घर स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले .           पूरग्रस्त कोकणवासीयांना सावरण्यासाठी त्यांना सढळ हाताने मदत करा या शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सोसायट्या व नागरीक यांनी दिलेल्या भरीव लोकसह भागातून व नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने महाड मधील कोंडिवटे,कोल, ढालकाठी, कोंडीवते, चव्हाण वाडी, बौध्द वाडी, गावळवाडी, घरटकर आळी, काकडतले, महाड शहर, महाड बाजारपेठ आदी गावात महिलांना आवश्यक असलेल्या वस्तू,घर स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तू आदीसह जीवनावशयक वस्तूंचे वाटप करण्यात आले.           नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले व शिवसेनेचे पदाधिकारी व  महिला कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन याचे वाटप केले.सुमारे ५०० नागरिकांना धान्य, कपडे, साड्या, गाऊन, चांदरी, टॅावेलस्, ब्लॅंकेटस्, साबण, फ्लोअर क्लिनर, सॅनिटरी नॅपकिन, चटई, सतरंज्या, मेणबत्ती, बिस्कीट, पुरुष व स्त्रियांचे अंतर्वस्र (इनर वेअर), फिनाईल, टूथपेस्ट, झाडू, भांडी असे परिपूर्ण किट देण्यात आली .या मदतीमुळे महिला भरवून गेल्या होत्या त्यांनी नगरसेविका विकास रेपाळे व त्यांच्या महिला टीमला यावेळी भरभरून आशीर्वाद दिले.           या आधी देखील नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या यांच्या वतीने तसेच प्रभागातील सोसायट्या,संस्था तसेच नागरीक यांनी दिलेल्या भरीव लोकसहभागातून दोन ट्रकभर ११०० कुटुंबांना पुरेल इतकी मदत महाड येथील प्रभात कॅालनी व असनपोई कंगोरीगड, बाजारपेठ, पोटे आळी, नवे नगर तसेच चिपळूण येथील सती,पिंपळी,संभाजी नगर, समर्थ नगर, दादर, तिवरे, आकले, कळंबस्ते ओवळी या गावांमध्ये किटचे वाटप स्वता नगरसेवक विकास रेपाळे व कार्यकर्त्यांनी केले होते.  

Post a Comment

0 Comments